लेखी परीक्षा स्वरूप
- 11/02/2021
- Posted by: myadmin
- Category: Police Bharti
पोलीस भरतीचे स्वरूप कसे आहे?
उत्तम शारीरिक क्षमता आणि किमान बारावी उत्तीर्ण असणाऱ्या युवक-युवतींसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना कायमस्वरूपी शासकीय रोजगार, देशाभिमानासह लोकसेवेची संधी प्रदान करणारा हा एक राजमार्ग आहे.
राज्यातील युवक-युवतींसाठी राज्य सरकारतर्फे भरती प्रक्रिया राबवली जाते. इच्छुक उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 28 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना 3 वर्षे शिथिल) असावे.

शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण (उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा)
शारीरिक पात्रता : महिला उमेदवारांसाठी उंची किमान 158 सें.मी. तर पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान 165 सें.मी. असावी. नक्षलग्रस्त भागातील उमेदवार आणि खेळाडू यांना उंचीत शिथिलता दिलेली असते. त्याचप्रमाणे शारीरिक मोजमापाचे आणखीही काही निकष आहेत. पोलीस बॅन्ड पदांसाठी वयोमर्यादा ही 18 ते 28 वर्षे असून शासन निर्णयानुसार 3 वर्षे मागासवर्गीयांसाठी शिथिल आहे. पोलीस बॅन्ड पदासाठी शारीरिक पात्रतेचे निकष वेगळे आहेत. मात्र, वाद्याची माहिती आणि वाद्य वाजविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

राज्य पोलीस शिपाई पदासाठी उमेदवारांना 100 गुण लेखी परीक्षा व मैदानी चाचणीसाठी 50 गुण असतात.
लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम :
पोलीस शिपाई पदासाठी अभ्यासक्रमात अंकगणित, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण या चार घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी असून त्यात 100 प्रश्न दिलेले असतात. वेळ – 90 मिनिटे. हा अभ्यासक्रम दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.
1) अंकगणित : लेखी परीक्षेत या घटकावर साधारणत: 25 प्रश्न अपेक्षित असतात. अंकगणित अभ्यासताना पाढे, सूत्र, क्षेत्रफळ, घनफळ व महत्त्वाची सूत्रे, संख्याज्ञान व त्यावरील क्रिया, दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक, घन व घनमूळ, घातांक, वर्ग व वर्गमूळ, काळ, काम व वेग, लसावि व मसावि, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, नफा-तोटा, सरासरी इत्यादी घटकांचा अभ्यास करावा.
2) सामान्यज्ञान व चालू घडामोडी : या घटकावर साधारणत: 25 प्रश्न अपेक्षित आहेत. त्यात भारत व जागतिक भूगोलासंदर्भातील प्रश्नही विचारले जातात.
देशाच्या इतिहासासंबंधातील प्रश्नांची संख्या कमी असली तरीही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना व व्यक्ती, आंदोलने, चळवळी, अहवाल, वृत्तपत्रे, समाजसुधारक यांचा अभ्यास करावा.
विज्ञान घटकात महत्त्वाचे शोध-संशोधक, अणुशक्ती आयोग व अणुऊर्जा केंद्रे, संशोधन संस्था, संरक्षण क्षमता, मानवी आहारातील घटक, मानवी श्वसन संस्था, नियोजित अवकाश कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र चाचण्या याकडे लक्ष पुरवावे.
3) बुद्धिमत्ता चाचणी : बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या अभ्यासासाठी सराव महत्त्वपूर्ण ठरतो. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न अंकमालिका, अक्षरमाला, सांकेतिक लिपी, सांकेतिक चिन्ह, भाषिक संकेत, सम आणि व्यस्त संबंध, वेळ, दिशा, रांगेतील क्रम, नातेसंबंध यावर आधारित असतात. या घटकावर 25 प्रश्न असतात.
4)मराठी व्याकरण : पोलीस शिपाईपदासाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये या घटकावर साधारणतः 20-25 प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरण विषयात वर्णमाला, शब्दाच्या जाती, विभक्ती, समास, संधी, प्रयोग, अलंकार, म्हणी. वाक्प्रचार इत्यादी घटकांचा समावेश असतो.
उमेदवारांची निवड (विविध संवर्ग व आरक्षणानुसार) : निवड करताना मैदानी चाचणीचे 50 गुण व लेखी परीक्षेच्या 100 गुणांचा विचार केला जातो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते.

((टीप : ही माहिती 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पोलीस भरती जाहिरातीला अनुसरून आहे. 2022 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत भरती प्रक्रियेत काही बदल होऊ शकतात, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)
मैदानी चाचणी
उमेदवारांची निवड (विविध संवर्ग व आरक्षणानुसार) : निवड करताना मैदानी चाचणीचे 50 गुण व लेखी परीक्षेच्या 100 गुणांचा विचार केला जातो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते.
५० गुणांची मैदानी चाचणीची गुणविभागणी :
पुरुष उमेदवार : | ||
अ) | 1600 मीटर धावणे | 30 गुण |
ब) | 100 मीटर धावणे | 10 गुण |
क) | गोळाफेक | 10 गुण |
एकूण | 50 गुण |
महिला उमेदवार : | ||
अ) | 800 मीटर धावणे | 30 गुण |
ब) | 100 मीटर धावणे | 10 गुण |
क) | गोळाफेक | 10 गुण |
एकूण | 50 गुण |

स्पष्टीकरण : जे उमेदवार लेखी चाचणीत किमान 35 टक्के (मागास प्रवर्गातील उमेदवारांबाबत 33 टक्के) गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील. त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या 1 : 5 या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल.
पुरुष उमेदवार (१६०० मीटर धावणे) : | ||
1600 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी – द्यावयाचे गुण | ||
1) | 5 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 30 | |
2) | 5 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 5 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 27 | |
3) | 5 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 5 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 24 | |
4) | 5 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 6 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 21 | |
5) | 6 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 6 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 18 | |
6) | 6 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 6 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 15 | |
7) | 6 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 7 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 10 | |
8) | 7 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 7 मि. 30 सेकंदापेक्षा कमी – 05 | |
9) | 7 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त – 00 |

पुरुष उमेदवार (१०० मीटर धावणे) | ||
100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी – द्यावयाचे गुण | ||
1) | 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 10 | |
2) | 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 10 | |
3) | 11.50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 12.50 सेकंदापेक्षा कमी – 09 | |
4) | 12.50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 13.50 सेकंदापेक्षा कमी – 08 | |
5) | 13.50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 14.50 सेकंदापेक्षा कमी – 07 | |
6) | 14.50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 15.50 सेकंदापेक्षा कमी – 05 | |
7) | 15.50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 16.50 सेकंदापेक्षा कमी – 03 | |
8) | 16.50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 17.50 सेकंदापेक्षा कमी – 01 | |
9) | 17.50 सेकंदापेक्षा जास्त – 00 |

पुरुष उमेदवार – गोळाफेक (गोळ्याचे वजन ७.२६० कि.ग्रॅ.) | ||
गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये) – द्यावयाचे गुण | ||
1) | 8.50 मीटर किंवा जास्त – 10 | |
2) | 7.90 मीटर किंवा जास्त, परंतु 8.50 मीटरपेक्षा कमी – 09 | |
3) | 7.30 मीटर किंवा जास्त, परंतु 7.90 मीटरपेक्षा कमी – 08 | |
4) | 6.70 मीटर किंवा जास्त, परंतु 7.30 मीटरपेक्षा कमी – 07 | |
5) | 6.10 मीटर किंवा जास्त, परंतु 6.70 मीटरपेक्षा कमी – 06 | |
6) | 5.50 मीटर किंवा जास्त, परंतु 6.10 मीटरपेक्षा कमी – 05 | |
7) | 4.90 मीटर किंवा जास्त, परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी – 04 | |
8) | 4.30 मीटर किंवा जास्त, परंतु 4.90 मीटरपेक्षा कमी – 03 | |
9) | 3.70 मीटर किंवा जास्त, परंतु 4.30 मीटरपेक्षा कमी – 02 | |
10) | 3.10 मीटर किंवा जास्त, परंतु 3.70 मीटरपेक्षा कमी – 01 | |
11) | 3.10 मीटरपेक्षा कमी – 00 |

महिला उमेदवार (८०० मीटर धावणे) | ||
800 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी – द्यावयाचे गुण | ||
1) | 2 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 30 | |
2) | 2 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 3 मि. 00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 27 | |
3) | 3 मि. 00 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 3 मि. 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 24 | |
4) | 3 मि. 10 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 3 मि. 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 21 | |
5) | 3 मि. 20 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 3 मि. 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 18 | |
6) | 3 मि. 30 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 3 मि. 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 15 | |
7) | 3 मि. 40 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 3 मि. 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 10 | |
8) | 3 मि. 50 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 4 मि. 00 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 05 | |
9) | 4 मि. 00 सेकंदापेक्षा जास्त – 00 |

महिला उमेदवार (१०० मीटर धावणे) | ||
100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी – द्यावयाचे गुण | ||
1) | 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी – 10 | |
2) | 14 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 15 सेकंदापेक्षा कमी – 09 | |
3) | 15 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 16 सेकंदापेक्षा कमी – 08 | |
4) | 16 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 17 सेकंदापेक्षा कमी – 07 | |
5) | 17 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 18 सेकंदापेक्षा कमी – 05 | |
6) | 18 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 19 सेकंदापेक्षा कमी – 03 | |
7) | 19 सेकंदापेक्षा जास्त, परंतु 20 सेकंदापेक्षा कमी – 01 | |
8) | 4.30 मीटर किंवा जास्त, परंतु 4.90 मीटरपेक्षा कमी – 03 | |
9) | 20 सेकंदापेक्षा जास्त – 00 |
महिला उमेदवार – गोळाफेक (गोळ्याचे वजन ४ कि.ग्रॅ.) | ||
गोळाफेकीचे अंतर (मीटरमध्ये) – द्यावयाचे गुण | ||
1) | 6 मीटर किंवा जास्त – 10 | |
2) | 5.50 मीटर किंवा जास्त, परंतु 6.00 मीटरपेक्षा कमी – 08 | |
3) | 5.00 मीटर किंवा जास्त, परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी – 06 | |
4) | 4.50 मीटर किंवा जास्त, परंतु 5.00 मीटरपेक्षा कमी – 04 | |
5) | 4.00 मीटर किंवा जास्त, परंतु 4.50 मीटरपेक्षा कमी – 02 | |
6) | 4.00 मीटरपेक्षा कमी – 00 |

((टीप : ही माहिती 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पोलीस भरती जाहिरातीला अनुसरून आहे. 2022 मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत भरती प्रक्रियेत काही बदल होऊ शकतात, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.)